Monday, March 26, 2012

काळे व.पु., संवादिनी


काळे .पु., संवादिनी, विश्वकर्मा साहित्यालय, पुणे, १९७२ (पृष्ठ संख्या ११३)

गुण: /१०

'
संवादिनी' वेगळे आहे. हा .पुं.नी केलेला प्रयोग आहे. आणि तो यशस्वी झालाय म्हणायला हरकत नाही. पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना एकदा कथा, लघुकथा, त्यांच्यामधली नॅरेशन लिहायचा कंटाळा आला. वर्णने, बारीक सारीक तपशील लिहिण्याचा उबग आला. मग त्यांनी विचार केला की कथा संपूर्ण संवादात का लिहू नये? स्वतःच्याच सहा कथा निवडून त्यांनी त्या कथांचे संवादात रुपांतर केले. शिवाय कुठेही नावे नाहीत, प्रस्तावनेला शीर्षक नाही, तसेच कथांनाही. एक कथा संपली की एक कोरे पान आणि मग पुढची कथा.

मग यात आणि नाटकात तो फरक काय? फरक असा की नाटकाच्या संहितेत पात्रांची नावे असतात. कोण कुठली वाक्ये बोलतेय ते लिहिलेले असते. प्रसंगी कंसांत सेटवर काय आहे, संवाद चालू असताना पाठी काय चालू आहे वगैरे वर्णन असू शकते. संवादिनी पुस्तकात असले काही नाही. नुसते संवाद. पण त्यातून आपल्याला कळते की कुठले वाक्य कुणाच्या तोंडी आहे. मराठीत पुरुष 'मी करतो' तर स्त्री 'मी करते' म्हणते. अशा वाक्यांवरून आपल्याला बोलणारा तो आहे का ती हे कळू शकते. (जे इंग्लिशमध्ये कठीण जाईल.) नुसती संवादातून कथा उभी करायला कौशल्य लागते. ते .पुं.नी दाखवले आहे. हा प्रयोग वेगळा आनंद देऊन जातो. शिवाय पाने झरझर पुढे सरकतात. ओघाने वाहणाऱ्या संवादांमध्ये वर्णनाचे अडथळे नाहीत.

बहुतेक कथा त्या काळाच्या द्योतक आहेत. 'एका मिठीची कथा' हलकी फुलकी आहे. 'धरले तर चावते' या कथेत कामावर जाणाऱ्या बायकांचा विषय आहे. 'आज तरी भांडशील ना' ही चांगल्यापैकी विनोदी कथा. 'आत्मनस्तु कामाय' अभिमान आणि नवरा बायको यांच्यातले संबंध याबद्दल बरेच काही सांगते. 'निरंजन मला उत्तर हवेय' मध्ये टेस्ट ट्यूब बेबी चा उल्लेख आहे. आणि 'दिवस उद्याचा' ही  ज्योतिष विद्येवरची विनोदी गोष्ट. 'निरंजन....' सारख्या गोष्टींत .पुं.ची भाषा मधेच कमालीची नाटकी, कृत्रिम होते. ते थोडे खटकते. कायम बोली भाषा ठेवणे त्यांना सहज जमले असते. या प्रयोगात तरी त्यांनी नाटक आणायचे नाही.

तात्पर्य: प्रयोग म्हणून अवश्य वाचण्याजोगे. मी वाचनालया तून आणलेली आवृत्ती पहिलीच, किंमत पाच रुपये! आता नव्या आवृत्तीत आणि नव्या प्रकाशकाचे पुस्तक उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment