Tuesday, February 21, 2012

काळे व.पु., पार्टनर



काळे .पु., पार्टनर, मेहता पब्लिशिंग  हाऊस, पुणे, १९७६. (पृष्ठसंख्या १५६)

गुण: ./१०

.पु.काळे ह्यांच्या खूप कथा वाचल्या होत्या, ऐकल्या होत्या. ही पहिलीच कादंबरी. ते कथाकथन करणारे म्हणून कादंबरीकडून काही अपेक्षा नव्हत्या. पण तिने थक्क केले. आत्तापर्यंत वाचलेल्या वपुंच्या पुस्तकांत हे त्यांचे मला सर्वात आवडलेले पुस्तक. ही नुसती कादंबरी नाही, त्यात पदोपदी तत्वद्यान आहे, संसारी आणि असंसारी माणसाचे बोलके अनुभव आहेत, काव्य आहे, नाट्यपूर्ण संवाद आहेत, लिहून ठेवण्यासारखी वाक्ये आहेत: () पोरगी म्हणजे झुळूक. अंगावरून जाते. अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही. () आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस जाने म्हणजे नरक. () लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस.
(4) As you write more and more personal, it becomes more and more universal.

पार्टनर, ज्याला नाव नाही, जो कसा दिसतो, काय पोशाख करतो ह्याचे कुठे वर्णन नाही ती व्यक्तिरेखा मनाला भिडते - प्रामाणिकपणामुळे आणि तत्त्वज्ञानामुळे. श्रीच्या कुटुंबातली माणसे - त्याची आई, मोठा भाऊ अरविंद, वाहिनी ह्यांचे वागणे, बोलणे कमालीने साकारलेले. त्याच्यातून त्यांच्या मनात आणि डोक्यात काय चाललेय हे वाचकाला दिसते.

दोष काढायचाच तर पार्टनर कादंबरीचा शेवट मला फार रुचला नाही. तशा शेवटची आवश्यकता नव्हती. पण जास्त कशाला सांगू, तुम्ही वाचा आणि स्वतःच ठरवा.

तात्पर्य: विकत घ्या, वाचनालयातून घ्या, पण घ्या आणि वाचा. तुमचा संसार चांगला चालू असेल तर आणि चांगला चालू नसेल तर, तुम्हाला ही कादंबरी चांगलीच भावेल.

No comments:

Post a Comment